नवी दिल्ली : अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. टॅरिफ लावण्यात आल्यानंतर त्याचा मोठा परिणाम हा दोन्ही देशांच्या व्यापारावर झाल्याचं पहायला मिळत आहे, याचा काही प्रमाणात फटका हा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील बसला आहे. एका रिपोर्टनुसार भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत महागाई वाढली आहे, अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत, दुसरीकडे भारताच्या सी फूडला अमेरिकेत मोठी मागणी आहे, मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारताच्या सी फूड इंड्रस्टीला मोठा फटका बसला आहे. तसेच डायमंड मार्केटवर देखील परिणाम झाला आहे. मात्र आता एक मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
एकीकडे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या निर्बंधांमुळे भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध ताणले गेलेले आहेत, तर दुसरीकडे मात्र भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढत आहे. रशियानं आता आपली अख्खी बाजारपेठ भारतासाठी ओपन केली आहे.एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारतीय कंपन्यांनी आपला मोर्चा रशियाकडे वळवला असून, रशियासोबतची निर्यात वाढली आहे, याचा फटका हा पाश्चिमात्य कंपन्यांना बसत आहे, रशियामध्ये भारतीय कंपन्यांचं प्राबल्य वाढलं आहे.
भारतीय कंपन्यांनी रशियामध्ये शिरकाव करताच पश्चिमेकडील देशांच्या कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतला आहे. याचा मोठा फायदा हा भारताच्या एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम) उद्योगांना होणार आहे. यामुळे भारतीय उद्योजकांना रशियामध्ये आपल्या वस्तू निर्यातीची फार मोठी संधी मिळाली आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की, काही दिवसांमध्येच भारतीय कंपन्या रशियन बाजारपेठेचा संपूर्ण ताबा घेऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या टॅरिफमुळे झालेलं भारताचं नुकसान भरू निघणार आहे. टॅरिफच्या संकटातून भारत लवकरच बाहेर पडू शकतो.
आयटीई ग्रुपचे सीईओ असलेले दिमित्री जावगोरोडनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आता भारतीय कंपन्यांनी रशियन ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. रशियामध्ये भारतीय मालाची मागणी वाढत आहे. आयटीई ग्रुप ही एक मोठी एग्झिबिशन कंपनी आहे, ही कंपनी भारतीय कंपन्यांना रशियामधील संधीची माहिती व्हावी, त्यांना रशियामध्ये आपला व्यावसाय वाढवण्यासाठी मदत व्हावी यासाठी काम करते. भारती कंपन्या मोठ्या संख्येनं रशियामध्ये येत असल्यानं आता पश्चिमेकडील देशाच्या कंपन्या देशातून काढता पाय घेत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कोरोनापूर्व काळात भारताचा रशियासोबत व्यापार केवळ 10.1 अब्ज डॉलरचा होता, जो 2024-25 मध्ये 2024-25 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2030 पर्यंत तो 100 अब्ज डॉलरपर्यंत पोहचू शकतो, असा अंदाज आहे.